Tuesday, December 18, 2018


 *राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा(सन-२०१८-१९)*

http://maa.ac.in/innovation2018-19

        *महाराष्ट्र राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु झाली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये झपाट्याने शाळा प्रगत होताना दिसू लागल्या आहेत. शाळा-शाळांमध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी व सुलभ होण्यासाठी काही नवोपक्रम राबवले जात आहेत.*
         *विविध स्तरावर राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील सर्व शिक्षकांना व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे मार्फत *सन-२०१८-१९  या वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा Online पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.**

           *MSCERT च्या कार्याची व्याप्ती पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशी झाली असल्याने या वर्षापासून ही स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित करण्यात येत आहे.*

*१. पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका*
*२. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक*
*३. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक*
*४. विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती*
*५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)*

 *नवोपक्रम सादर करण्यास खाली लिंक देण्यात येत आहे*

http://maa.ac.in/innovation2018-19/

थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लीक करा.


 *सर्व स्पर्धकांनी आपला टाइप केलेला नवोपक्रमाचा अहवाल वरील लिंक मध्ये अपलोड करावयाचा आहे.*

 *लिंक भरण्याआधी स्पर्धकांनी स्पर्धेचे  Guidelines व Rules and Conditions वाचणे आवश्यक आहे.*

*सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.*

       *सदर लिंक 31 डिसेंबर 2018 पर्यंत नवोपक्रम सादर करण्यास खुली राहील.*

       *या लिंक व मेसेज सोबत नवोपक्रम स्पर्धेसंदर्भातील प्रसिद्धी पत्रक सोबत पाठवत आहोत.*

        *तरी आपल्या संपर्कातील नवोपक्रम करू इच्छिणाऱ्या सर्व शिक्षकांपर्यंत हा मेसेज व लिंक पोहोचविण्यात यावी.*


*डॉ. सुनिल मगर*
 *संचालक* ,
*महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे*